Talegaon News : माजी प्राचार्य भास्कर नागरे यांचे निधन

एमपीसी न्यूज : संगमनेर येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज विद्यालयाचे माजी प्राचार्य भास्कर भीमराज नागरे (वय 68) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. तळेगाव दाभाडे येथील नागरे अ‍ॅक्सिडेंट अ‍ॅन्ड जनरल हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ. नितीन नागरे यांचे ते वडील होत. 

विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक म्हणून सुपरिचित असलेल्या नागरे सरांनी वडगावपान येथील जनता विद्यालायात अनेक वर्षे चित्रकलेच्या ज्ञानदानाची सेवा केली.

त्यांच्या पश्चात पत्नी निवृत्त कलाशिक्षिका श्रीमती मंगला तर डॉ. नितीन आणि उद्योजक गोपाळ अशी दोन मुले तसेच डॉ. सौ. सुरभी व उद्योजिका सौ. वनिता या दोन सुना आणि विवाहित मुलगी रोहिणी सोनार, जावई सतीश सोनार, नातवंडे असा परिवार आहे.

भास्कर नागरे सरांनी चित्रकलेतील उच्चस्तरीय जी. डी. आर्ट ही डिग्री संपादित केली होती. सरांनी आपल्या चित्रकलेच्या निष्णात ज्ञानाच्या जोरावर अनेक कला विद्यार्थी घडविले. कलेचा अधिक फायदा विद्यार्थ्यांना करून देत प्रावीण्य मिळवून दिले. निर्व्यसनी, शांतताप्रिय तसेच विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक काळाच्या पडद्याआड गेल्याने विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षक वर्ग, मित्र वर्ग, आप्तेष्ट, नातेवाईक व नागरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.