Talegaon News : श्रीराम विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ॲप

आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सलग चौथ्या वर्षी राबविला उपक्रम

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त माय मावळ फाऊंडेशन व आमदार सुनिल शेळके युवा मंच यांच्या वतीने मावळ तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना घरी सुरक्षित राहून स्मार्ट अभ्यासासाठी ‘आयडियल स्टडी’ हे ॲप इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नवलाख उंब्रे येथील श्रीराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत इन्स्टॉल करुन देण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेटे, मुख्याध्यापक तुकाराम गावडे तसेच माय मावळ फाऊंडेशनचे सदस्य व शिक्षकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्यक्षात शाळा सुरु झालेल्या नाहीत. ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन येत्या शैक्षणिक वर्षातील शिक्षणास सुरुवात करण्याचे निर्देश शासनाकडून मिळाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळण्यासाठी डिजिटल शिक्षण पद्धतीचा अवलंब सध्या केला जात आहे. तर आमदार शेळके यांच्या वतीने मागील तीन वर्षांपासून हे ॲप दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत देण्यात येत आहे.

‘विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अनेक नवे प्रयोग केले जात आहेत. सर्वांना योग्य शिक्षण ही संकल्पना घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम मावळ तालुक्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.