Talegaon News : सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना अभिवादन!

एमपीसी न्यूज –  सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषद नगराध्यक्ष चित्रा जगनाडे व उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बजरंग जाधव, व्यवस्थापक बबनराव दाभाडे, संचालक सुनील दाभाडे,रूपाली दाभाडे, प्रमोद गायकवाड, हभप माउली दाभाडे, रविंद्र काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या कार्याचा आढावा मान्यवरांनी व्यक्त करून आदरांजली समर्पित करण्यात आली. तसेच तळेगाव दाभाडे येथील सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचे समाधीस्थळी जाऊन सरसेनापती दाभाडे घराण्यातील वंशज, गावातील नागरिक तसेच संस्था पदाधिकाऱ्यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.