Talegaon News: मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघातर्फे बुधवारी वाहनचालकांसाठी मार्गदर्शन शिबिर

एमपीसी न्यूज – मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघ व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय (वाहतूक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने अवजड वाहतूक करणारे चालक मालक यांना सुरक्षित रस्ते वाहतूक, वाहतूक नियमांचे पालन व अपघातविरहित वाहतुकीसाठी करण्यात येणा-या उपाययोजना ह्या विषयी मार्गदर्शन शिबिर उद्या बुधवार (दि 27) रोजी आंबी येथील शिवसोनाई मंगल कार्यालयात सायं 4 ते 7 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष विलास काळोखे व उपाध्यक्ष सागर पवार यांनी दिली.     

सालाबाद प्रमाणे ह्या वर्षीही मावळ तालुका व परिसरातील अवजड वाहतुक करणारे चालक मालक यांना सुरक्षित रस्ते वाहतुक, वाहतुक नियमांचे पालन व अपघात विरहित वाहतुकीसाठी करण्यात येणा-या उपाययोजना ह्या विषयी मार्गदर्शन व्हावे म्हणून शिबिराचे आयोजन मावळ तालुका खाण व क्रशर उदयोजक संघ व पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालय (वाहतूक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रम आमच्या संघटनेमार्फत गेली सहा वर्षे घेत आहोत. तरी आपण सदर कार्यक्रमास उपस्थित राहुन सर्व अवजड वाहतूक करणारे चालक मालक यांना उपस्थित राहून योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी विनंती खाण व क्रशर उद्योजक संघाच्या वतीने सचिव श्रीकांत वायकर यांनी केली आहे.

कार्यक्रमानंतर सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे असे संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.