Talegaon News : विद्यापीठ अभ्यास मंडळ प्रमुखांची नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक संस्थेला सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन डॉ. डी. एस. बोरमाने यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांस सदिच्छा भेट दिली.

डाॅ. बोरमाने यांनी नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एनएमआयईटी) आणि नूतन काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (एनसीईआर) येथील इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन विभागांसह महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा या प्रसंगी घेतला. त्यावेळी डॉ. डी. जी. भालके हे देखील उपस्थित होते.

महाविद्यालयातील तसेच ई अँड टी सी विभागातील उपक्रमांचे तसेच महाविद्यालयाच्या इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन उपक्रमातील विविध आस्थापनांशी झालेले करार, कॅम्पस प्लेसमेंट, इंटर्नशिप, विदयार्थी प्रशिक्षण, उद्योजकता विकास उपक्रम, प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, इंडस्ट्री व्हिजिट आदी कामाची पाहणी करून कौतुक केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा उपस्थित होते. ई अँड टी सी विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास देवतारे, संयोजक प्रा. सागर जोशी, प्रा. राहुल पाटील, प्रा. सुषमा भोसले, प्रा. पूजा शर्मा यांनी या भेटीचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.