Talegaon News : प्रामाणिक रिक्षा चालकाचा ‘आदर्श विद्या मंदिर’कडून सत्कार

एमपीसी न्यूज – आदर्श विद्या मंदिर शाळेच्या एका कर्मचाऱ्याचे प्रवासादरम्यान रस्त्यावर पडलेले पैसे प्रामाणिक रिक्षा चालकाने घरी जाऊन परत केले. असलेल्या हजारो रुपयांच्या रकमेला हात न लावता रिक्षा चालकाने हा प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल आदर्श विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला.

आदर्श विद्या मंदिर शाळेचे कर्मचारी अभिजीत अरुण चौधरी यांनी रविवारी (दि 1) रोजी सकाळी अकराच्या दरम्यान शाळेच्या शेजारील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून पैसे काढले आणि घराच्या दिशेने स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना नजरचुकीने आठ हजार रुपये खिशातून रस्त्यावर अस्ताव्यस्त पैसे पडले.

त्यांच्या गाडीच्या मागून जात असणारे जिजामाता रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते व रिक्षा चालक शंकर ज्ञानदेव शेळके यांनी पैसे पडताना पाहिले. क्षणाचाही विलंब न करता रिक्षा थांबवून शेळके यांनी पैसे गोळा केले, चौधरी यांना आवाजही दिला.

परंतु तो त्यांनी ऐकला नाही, व्यक्ती ओळखीची असल्याचे लक्षात आले आणि रिक्षामधील ग्राहकाला लगोलग उतरवून चौधरी यांच्या घरी जाऊन शेळके यांनी सदर रक्कम प्रामाणिकपणे परत केली.

त्याबद्दल प्रामाणिक रिक्षा चालक शंकर शेळके यांचा आदर्श विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.