Talegaon News : शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल शुभश्री भोरे हिचा गौरव

0

एमपीसीन्यूज : इयत्ता 8 वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा व तालुका स्तरावर गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या शुभश्री काकासाहेब भोरे या विद्यार्थिनीचा जीवन विद्या मिशनच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सतशिष्या सिरसाठताई, शाखेचे सचिव डॉ. शेखर राहाणे, विनायक कदम, संभाजी देशमुख, शंकर कावडे, बाळासाहेब चव्हाण, दत्तात्रय गायकवाड, शरद बोर्गे उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालय विद्यालयातील शुभश्री भोरे या विद्यार्थिनीने इयत्ता 8 वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा व तालुका स्तरावर गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर होवून गुणवत्ता यादीही जाहीर झालेली आहे.

या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल शुभश्री भोरे हिचा जीवन विद्या मिशन मुंबई, तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला.

या यशाबद्दल शुभश्री म्हणाली, माझ्या यशात माझे आई-वडीलांचा मोठा वाटा आहे, त्याचप्रमाणे सद्गुरू श्री वामनराव पै निर्मिती विश्व प्रार्थना, माझे स्वताचे‌ प्रयत्न आणि माझ्या गुरुजनांचे , संस्था चालकांचे आशीर्वाद यामुळेच मला हे यश मिळाले.

विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची ट्युशन व इतर कोणाचेही मार्गदर्शन न घेता, सेल्फ स्टडीवर भर दिला. भविष्यात नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मनोदय तिने व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.