Talegaon News : निवृत्त शिक्षक सुखदेव माने यांचे निधन

एमपीसीन्यूज : जुन्या पिढीतील इंग्रजीचे अध्यापक आणि आदर्श शिक्षक सुखदेव कृष्णराव माने (वय 87) यांचे मंगळवारी (दि. 6) रात्री तळेगाव दाभाडे ( ता. मावळ) येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रयत शिक्षण संस्था आणि मायणी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत त्यांनी इंग्रजीचे अध्यापक म्हणून 39 वर्षे काम केले. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील माहुली गावचे शेतकरी कुटुंबातील होते.

इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. माने यांचे अनेक विद्यार्थी प्रशासनात अधिकारी असून शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या दोन मुली डॉक्टर तर एक मुलगी प्राध्यापक आहे.

अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अजित माने यांचे ते वडील होत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.