Talegaon News: महिलेवर अत्याचार करणाऱ्या वकिलाला त्वरित अटक करा, पीडितेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – महिलेची फसवणूक व बलात्कार तसेच धमकी प्रकरणातील आरोपी असलेला तळेगाव दाभाडे (Talegaon News)  येथील वकील श्रेयस श्रीराम पेंडसे याला वडगाव मावळ न्यायालयाने शुक्रवारी (दि.30 सप्टेंबर) जामीन नामंजूर केला आहे. अशा वेळी आरोपी हा तळेगाव परिसरात वावरत असून त्याला लवकरात लवकर अटक करून न्याय मिळावा, अशी मागणी पीडितेने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.  

लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी पीडित तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon News) दाखल केलेल्या तक्रारीवरून वडगाव मावळ न्यायालयात दावा सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ॲड. श्रेयस श्रीराम पेंडसे याला देण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज पीडित तरुणीच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केला होता.

संबंधित आरोपी पोलीस ठाण्यात बोलवून देखील उपस्थित राहिला नाही तसेच न्यायालयातील सुनावणीसही गैरहजर राहिल्याची बाब पीडित तरुणीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आता कोणतीही अडचण उरलेली नाही, असे पीडित तरुणीने म्हटले आहे.

न्यायालयाच्या आदेशालाही 24 तास उलटून गेले आहेत. आरोपी श्रेयस पेंडसे हा आरोपी तळेगाव परिसरातच (Talegaon News) असून त्याला त्वरित अटक करावे,अशी मागणी पीडितेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ आवारे, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनीही पीडित तरुणीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने गजाआड करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.