Talegaon News : किल्ले बनवा स्पर्धेत मोठया गटात शिवानी वारींगे तर लहान गटात उदय नखाते प्रथम

एमपीसी न्यूज – वारंगवाडी मावळ येथील कै. बबनराव कलावडे प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत मोठ्या गटात शिवानी संदीप वारींगे व लहान गटात उदय श्रावण नखाते यांनी पहिला क्रमांक पटकाविला. विजेत्यांना रोख रक्कम व ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले.

कै. बबनराव कलावडे प्रतिष्ठानचे संचालक विक्रम प्रकाश कलावडे यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने गड किल्ले स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये मोठ्या गटात शिवानी संदीप वारींगे प्रथम (3000रु, ट्राॅफी) ऋतुजा राजेंद्र वारींगे द्वितीय (2000 रू, ट्राॅफी) तर दर्शन नवनाथ वारींगे तृतीय क्रमांक (1500रू,ट्राॅफी) आणि उत्तेजनार्थ रोहन बबन सावले (500/ रुपये, ट्राॅफी) यांनी मिळविला.

लहान गटात प्रथम- उदय श्रावण नखाते (2000 रू), द्वितीय- सार्थक सोमनाथ शेळके (1500 रू), तृतीय- हर्षवर्धन सोमनाथ गव्हाणे (1000 रू) तर उत्तेजनार्थ आर्यन सिताराम धुमाळ (500 रू) याने मिळविला.

कै. बबनराव कलावडे प्रतिष्ठानचे संचालक विक्रम कलावडे, प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव व प्रा. डाॅ. प्रमोद बोराडे यांच्या हस्ते रोख रक्कम व ट्राॅफी देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले.

सर्व विद्यार्थ्यांचे गड किल्ल्यांची सहलीचे आयोजन करावे, तरच मुलांना गड किल्ल्याच्या बाबत जास्त माहिती मिळेल, आवड निर्माण होईल असे व्याख्याते विवेक गुरव व प्रा. डाॅ. प्रमोद बोराडे सर यांनी सांगितले.

नवनाथ वारींगे, संजय वारींगे, सिताराम धुमाळ, सचिन वारींगे, महेंद्र बो-हाडे, रामनाथ धुमाळ, नितीन नखाते, भाऊ शिंदे, विकास वारींगे, किशोर वारींगे, सागर तुमकर व सुदर्शन तरूण मंडळाचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन गणेश थोरवे, मिथून शेळके, ऋषीकेश वारींगे, धनंजय काकडे आदींनी केले. सुत्रसंचालन नितीन नखाते यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विक्रम कलावडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.