Talegaon News : गरीब व गरजू रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शहरात जनसेवा थाळीचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने बुधवार (दि.14) पासून शनिवार (दि.1 मे) पर्यंत लॉकडाऊन सुरु केला असून गरीब व गरजू रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौक येथे 5 रुपयात जनसेवा थाळी उपक्रमाचे उद्घाटन रविवारी (दि.18) दुपारी 1 वा. रुग्णवाहिका चालक अनिल कारके यांच्या हस्ते करण्यात आले.

या जनसेवा थाळीला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (दि.1 मे) पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून जर लॉकडाऊन वाढला तर जनसेवा थाळी उपक्रम लॉकडाऊन मध्ये सुरूच राहणार असे नियोजक अनिल कारके व श्याम मोहिते यांनी सांगितले.

“जनसेवा समिती विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे म्हणाले मावळ रुग्ण संख्या वाढत असुन सर्वसामान्य गरीब व गरजू रुग्णांची या लॉकडाऊन मध्ये गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना एकवेळ जेवणाची थाळी उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.

हा उपक्रम दुपारी 12:30 ते 2:30 वा. यावेळेत सुरु असणार आहे. रविवार व बुधवार अंडा करी तर इतर दिवशी चपाती, भात, भाजी, लोणचे तसेच पिण्याचे पाणी आदी सुविधा देण्यात येणार आहे. ”

याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, अनिल पवार, किशोर कारके, नगरसेवक निखिल भगत, संतोष शिंदे, संतोष दाभाडे, समीर खांडगे, सुनील कारंडे, चिराग खांडगे, विकास पवार, सतीश ढेंबे, अनिल कारके, मुन्ना जाधव, सुनील जैन, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण ओसवाल व बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते.

“लाभार्थी पंढरीनाथ सुतार म्हणाले लॉक डाऊनच्या काळात हॉस्पिटल व औषधोपचार यांचा खर्च त्यामुळे जगणे अवघड झाले होते. जनसेवा थाळीमुळे माझ्यासारख्या गरीब व गरजूंना जगण्याचा आधारच मिळाला. जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांचे खूपच आभार त्यांच्या सामाजिक कार्याला सलाम ” मराठा क्रांती चौक परिसरात तळेगाव जनरल हॉस्पिटल असून मोठ्या संख्येने रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक असतात.

त्यांना जेवणासाठी या परिसरात व्यवस्था नसल्याने त्यांना उपाशी राहण्याची वेळ आली होती पण जनसेवा थाळीमुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक तसेच गरीब व्यक्तींना आधार मिळाल्याने प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.