Talegaon News : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आधार कार्ड मशीनची संख्या वाढवा

एमपीसी न्यूज – काल दिनांक 26 एप्रिल 2023, मंगळवार रोजी मावळ तालुका (Talegaon News) नवनियुक्त तहसीलदार विक्रम देशमुख यांना आधारकार्ड अद्ययावतीकरण (Update) बाबत निवेदन देण्यात आले. आधारकार्ड अद्ययावतीकरण अभियान चालू आहे पण आधारकार्ड मशिन यांची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी आधार मशिनची संख्या वाढवावी आणि आधार अद्यायावतीकरण शिबिर आयोजित करावीत. ही मागणी भारतीय जनता पार्टी, तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने निवेदनाद्वारे केली. यावर मशिन ची संख्या वाढविण्यात येईल असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार साहेब यांचा भाजपा तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, नगरसेविका शोभाताई भेगडे,सरचिटणीस रजनी ठाकूर, शोभा परदेशी,ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, कामगार आघाडी अध्यक्ष अशोक दाभाडे, कार्याध्यक्ष स्वप्निल भेगडे, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, सचिव वालावलकर काका, व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष सागरशेठ शर्मा, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनिल कांबळे, पदवीधर आघाडी कार्याध्यक्ष संतोष भोसले, ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख अमित भागीवंत, का.आ.उपाध्यक्ष अनिल शेलार, शहर सचिव महावीर कनमुसे आदी उपस्थित होते.
Today’s Horoscope 26 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आधार कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. आधार कार्डवर दिलेली माहिती पूर्णपणे अचूक असणे आवश्यक आहे. आधार कार्डवरील कोणत्याही प्रकारची चूक आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकते.आधार कार्ड बाबत फसवणुक टाळण्यासाठी, सरकार वापरकर्त्यांना दर दहा वर्षांनी त्यांची आधार कार्ड माहिती अपडेट करण्यास प्रोत्साहित करते. सरकारने आता आधार कार्डसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. यानुसार, जर आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी तयार केले गेले असेल आणि ते अपडेट केले नसेल, तर ते आता अपडेट केलेले असणे आवश्यक आहे. तर आधार कार्ड चे अपडेट करण्यासाठी जे मशीन लागतात तेच वाढवावे (Talegaon News) असे निवेदन करण्यात आले आहे.