Talegaon News : राष्ट्रीय ई-पोस्टर स्पर्धेत उन्नती बोरोले द्वितीय

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या बी फार्मसी महाविद्यालयाची विद्यार्थिनी उन्नती बोरोले हिने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ई-पोस्टर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

जागतिक परिचारिका दिनानिमित्त बापूसाहेब देशमुख सेवा प्रतिष्ठान संचलित सिद्धी फार्मसी महाविद्यालय नांदगाव, जि. ठाणे व निसर्ग हर्बासुटीकल्स संस्था मुंबई यांच्या तर्फे आयोजित या ऑनलाइन स्पर्धेत देशभरातील 700 हून अधिक महाविद्यालयातील 1400 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

उन्नतीने ‘कोरोना महामारीमध्ये औषध विक्रेत्यांची भूमिका’ या विषयावर तिची पोस्टर कलाकृती साकारली होती. त्यास राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम द्वितीय पोस्टर्स म्हणून निवडण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे व डाॅ दीपक शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष शैलेश शाह, संस्थेच्या विश्वस्त व उद्योजिका निरुपा कानिटकर यांनी या यशाबद्दल उन्नतीचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. बी. बी. जैन यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले असून तिचा यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले.

“उन्नती सारख्या गुणी मुलींमुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेत भरघोस यश मिळविणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांची कामगिरी तसेच विविध क्रीडा स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चर्चासत्र आणि इतर उपक्रमात या इंद्रायणी संस्थेचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. त्यांना सतत प्रोत्साहन देण्यासाठी विश्वस्त मंडळ प्रयत्न करत असते.” – रामदास काकडे, अध्यक्ष, इंद्रायणी विद्या मंदिर संस्था

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.