Talegaon News : लेखणी बंद आंदोलनात इंद्रायणी महाविद्यालयाचा सहभाग 

एमपीसी न्यूज – राज्यभर शिक्षकेतर कर्मचा-यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनास पाठींबा देत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी देखील लेखणी बंद केली आहे. याचा मोठा फटका अंतिम वर्षाच्या परीक्षा बारगळण्यात झाला आहे.

या आंदोलनात तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. सर्व कर्मचा-यांनी कामबंद करून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन आंदोलन केले.

या आंदोलनात महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी सुबोध गरूड, रविंद्र बिक्कड, नामदेव ढोरे, सतिश लोखंडे, राजेंद्र जवरे, संतोष शिरसाट, किशोर शेवकर, अनुराधा पंधारे, गणेश पोरे, हेमंत हळबे, तुकाराम राठोड, कैलास भुजबळ, बाळू बारहाते, विजय मावळकर,  अनिल गवळी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचा-यांचा सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जिवित करणे, तीन लाखाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे ह्या मागण्यासह कृती समितीच्या अन्य मागण्यांसाठी काम बंद राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा इंद्रायणी महाविद्यालयाचे वरीष्ठ लिपिक सुबोध गरूड यांनी यावेळी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a123dacf6b2d32',t:'MTcxNDA3NzU0My40ODkwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();