Talegaon news : आमदार शेळके यांच्या सूचनांची ‘आयआरबी’कडून अंमलबाजवणी; सोमाटणे टोलनाक्यावरील लेनमध्ये केली वाढ

एमपीसीन्यूज : सोमाटणे येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर दररोज सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्वतः वाहतूक कोंडीत अडकलेली वाहने टोल नाक्यावरुन वाहने सोडली. त्यावेळी त्यांनी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याची अंमलबाजवणी करीत ‘आयआरबी’च्या वतीने शुक्रवारी (दि.15) नव्याने महामार्गाच्या दुतर्फा प्रत्येकी तीन अश्या सहा लेन वाढविल्या आहेत. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सोमटणे येथील जुना मुंबई पुणे महामार्गावरील टोल नाक्याच्या दुतर्फा नुकत्याच दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन टोल उघडून वाहनांची कोंडी सोडवली होती.

तसेच वाहनचालकांना टोलनाक्यावर जास्तवेळ थांबावे लागू नये यासाठी त्यांना त्वरित टोल भरल्याची पावती द्यावी, यासाठी टोलनाक्यावरील लेन व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी अश्या सुचना केल्या होत्या.

आठ दिवसात टोल नाक्यावरील वाहनांची कोंडी कमी न झाल्यास सर्व वाहने टोल न घेता सोडण्यात येतील, असा इशाराही आमदार शेळके यांनी टोल व्यवस्थापकांना देण्यात आला होता.

दरम्यान, ‘आयआरबी’च्या टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी आमदार शेळके यांच्या सुचनांची तात्काळ दखल घेत अंमलबजावणी सुरु केली. त्यानुसार टोलनाक्यावरील लेन व कर्मचार्‍यांची संख्या तातडीने वाढवली. पूर्वी टोल घेण्यासाठी 8 लेन होत्या, त्या आता 14 करण्यात आल्या आहेत. तसेच यासाठी 21 संगणक चालक व 15  पर्यवेक्षक नेमण्यात आले असल्याची माहिती ‘आयआरबी’चे व्यवस्थापक वामन राठोड यांनी दिली आहे.

सोमाटणे येथील टोलनाक्यावरील लेन व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविल्याने आता वाहनचालकांना टोलनाक्यावर टोल देण्यासाठी तासंतास थांबावे लागत नाही तसेच टोलनाक्यावरील वाहनांच्या कोंडीची समस्या देखील यामुळे सुटल्याने नागरिकांचा त्रास कमी झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून टोलनाक्यावरील वाहनांच्या कोंडीची समस्या आमदार सुनिल शेळके यांनी पुढाकार घेऊन तातडीने सोडविल्याने नागरिकांमधून त्यांचे आभार व कौतुक व्यक्त केले जात आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.