Talegaon News : आधी केलेची पाहिजे … कलापिनी संस्थापक स्मृतिदिन

एमपीसी न्यूज – 24 नोव्हेंबर 1978 साली कलापिनीचे संस्थापक कै. डॉ. शंकरराव वासुदेव परांजपे यांचे निधन झाले 1979 साली तळेगावातील सर्व संस्थांनी एकत्रित सांस्कृतिक कार्यक्रम करून त्यांना आदरांजली वाहिली त्यावेळी त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृष्णराव भेगडे व नाट्य चित्रपट कलाकार नारायण भावे होते. त्या वर्षीपासून पुढे दर वर्षी ‘आधी केलेची पाहिजे’ या उपक्रमात कर्तुत्ववान व्यक्तींची मुलाखत, अनुभव कथन आणि कार्यशाळा असे आयोजन करण्यात येते.

या उपक्रमाच्या माध्यमातून देवराईचे गिरीश तात्या खेर, संपादक विवेक इनामदार, यशस्वी व्यावसाईक शिरीष मालपाठक, महेश महाजन, समाज सेवेचा वारसा जपणारे डॉ. कृष्णकांत वाढोकर, महिला उद्योजक निरुपा कानिटकर, उद्योजक दीपक शहा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रख्यात हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत अशा दिग्गजांचे अनुभव कथन, अरविंद परांजपे व दिलीप भाई शहा यांचे गुणवत्ता वर्धन शिबीर, संजीव सुळे यांची सूत्रसंचालन कार्यशाळा यांचा समावेश होता.

या वर्षी याच उपक्रमांतर्गत आज (मंगळवार दि. 24 नोव्हेंबर) सायंकाळी 5.30 वाजता कलापिनीच्या नवीन रंगमंचावर कलापिनीचे कलाकार गीते, कीर्तन, नृत्य, नाट्यप्रवेशयांनी नटलेला बहारदार विविध रंगी कार्यक्रम ‘वारसा’ हा कार्यक्रम सादर करून संस्थापकांना अभिवादन करणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कै. डॉ. शं. वा. परांजपे यांचे स्नेही कृष्णरावजी भेगडे, डॉ. कृष्णकांत वाढोकर आणि  गोरखनाथ काळोखे असणार आहेत.

सध्या असलेल्या कोविड 19 च्या बंधनामुळे हा कार्यक्रम कलापिनीच्या फेसबुक पेज वर लाईव्ह पद्धतीने पाहता येणार आहे तरी आपण सर्व कालापिनीवर प्रेम करणाऱ्या रसिकांनी हा कार्यक्रम बघावा अशी विनंती नम्र विनंती कलापिनी अध्यक्ष विनायक अभ्यंकर आणि विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी केलीआहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.