Talegaon News : कलापिनीचे कुमारभवन नाट्यप्रशिक्षण; अभिनय शिकता शिकता नाटक करुया’संपन्न

एमपीसी न्यूज – अभिनय शिकता शिकता नाटक करुया’ हे ब्रीदवाक्य ठेवून कलापिनी कुमार भवन तर्फे 28 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत कोविड 19 चे सर्व नियम पाळून दर रविवारी कुमार नाट्यप्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.

पुणे येथील सत्यम कोठावदे हे प्रमुख मार्गदर्शक होते विद्यार्थ्यांचा या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आटपाट गावचा गुणा ही बालनाट्य या कार्यशाळेत बसविण्यात ही बालनाट्ये बसवत असतानाच सत्यम दादांनी अभिनय, देह बोली, स्पष्ट खणखणीत, आवाज, वेशभूषा, नेपथ्य, पूरक संगीत, रंगमंचावरील वावर अशा नाटकासाठी आवश्यक गोष्टी शिकवल्या प्रात्यक्षिकासह हे केल्यामुळे प्रत्येकालाच हे चांगल्या प्रकारे शिकता आले आणि नाटकाच्या सादरीकरणाच्या वेळी त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला. 21 मार्च रोजी झालेल्या समारोप समारंभात शिबिरार्थी मुलांनी दोन्ही बालनाट्य सहज सुंदर पद्धतीने सादर केली.

सुधीर खानोलकर आणि सुप्रिया खानोलकर समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते हस्तकला, चित्रकला, क्विलिंग वारली पेंटिंग अशा अनेक कलांमध्ये पारंगत असलेल्या सौ सुप्रिया खानोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वत:च्या आवडीचा कोणताही एक छंद नक्की जोपासा त्यामुळे स्वतःला खूप आनंद व समाधान मिळते असे सांगितले तर सुधीर खानोलकर यांनी बालनाट्य बघून मुलांचे छान सादरीकरण केल्याबद्दल कौतुक केले पाहुण्यांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

सत्यम कोठावदे यांनी मनोगत व्यक्त करताना मुलांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे बालनाट्ये कमी वेळात बसवता आली याचा आनंद झाला व समाधान वाटले असे सांगितले तसेच कलापिनीने ही संधी दिल्याबद्दल कलापिनीचे आभार मानले डॉ. अनंत परांजपे यांनी आभार मानले व बालनाट्याची पहिलीच वेळ असूनही चांगले सादरीकरण केल्याबद्दल मुलांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी लिमये यांनी केले कलापिनीच्या उपाध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी या संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन केले होते.

अनघा बुरसे, ज्योती ढमाले, केतकी लिमये, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे, हरीश पाटील यांच्या उत्तम सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला .

शासनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम सादर करण्यात आला कलापिनी च्या श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.