Talegaon News : फिट इंडिया स्पोर्ट्स कॅम्पेनचा प्रारंभ

नूतन कॉलेजच्या मैदानावर खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाने निर्देशित केल्यानुसार राज्यभरातील महाविद्यालयांच्या मैदानांवर फिट इंडिया स्पोर्ट्स (थीमॅटिक) कॅम्पेनचा प्रारंभ झाला. मंगळवारी (दि 1 डिसेंबर) नूतन कॉलेजच्या मैदानावर खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, संस्थेच्या अँटीरॅगिंग कमिटीचे सदस्य व पत्रकार अमीन खान, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख राजेंद्र लांडगे, प्राचार्य ललीतकुमार वाधवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व विद्यार्थी सहभागी झाले होते.

हा उपक्रम 1 ते 30 डिसेंबर पर्यंत दररोज सुरू राहणार आहे. त्यात सर्वांना विनाशुल्क सहभागी होता येईल, अशी माहिती प्रा. लांडगे यांनी दिली. दररोज सकाळी किमान अर्धातास मैदानावर प्रत्येकाने आपापल्या खेळांचा सराव करणे आणि नवोदितांना किंवा क्रीडा प्रेमींना त्याची माहिती देऊन एकत्रित सराव करण्याचे आवाहन सहसचिव शेलार आणि सदस्य अमीन खान यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.