Talegaon News : लक्ष्मण माने यांची अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य लक्ष्मण माने यांची अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

ही निवड अखिल भारतीय कैकाडी समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय मेडे, श्रीहरी धाम सत्संग भवनचे संस्थापक बाळासाहेब जाधव, उद्योगपती बाबासाहेब माने, प्रा. बाळासाहेब माने, तानाजी जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष सुशांत माने , पुणे शहर उपाध्यक्ष अमोल माने, हवेली तालुका अध्यक्ष अनील माने, सुशांत माने यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

माने हे कैकाडी समाजाच्या सामाजिक चळवळीत भाग घेत असताना ते भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत विविध पदांवर कार्यरत आहेत. तसेच 1997 च्या नगरपरिषद शिक्षण मंडळाचे पोटनिवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले होते. भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.