Talegaon News: इंद्रायणी महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्तऑनलाईन व्याख्याने 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ वक्ते प्राचार्य प्रदीप कदम तसेच इंद्रायणी महाविद्यालयातील प्रा. आर आर डोके तसेच व्याख्याते डाॅ. प्रमोद बोराडे व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. मिलिंद खांदवे यांनी याप्रसंगी व्याख्यान दिले.

याप्रसंगी बोलताना प्रदीप कदम म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कार्य विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणले पाहिजे, गांधीजींच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह या त्रिसूत्रीचा प्रत्यक्ष जीवनात आपण वापर केला पाहिजे. त्यांनी दिलेला लढा हा केवळ इतिहास नसून एक जीवन आहे. गांधीजींच्या विचारांमधून महिलांना सर्व क्षेत्रात समान संधीच्या वाटा निर्माण झाल्या. गांधी यांच्या समग्र विचारांवर प्रकाश प्राध्यापक कदम यांनी टाकला. व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू मांडले.

कला शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डोके यांनी, मिठाचा सत्याग्रह स्वदेशीचा वापर, भारत छोडो आंदोलन ग्रामस्वराज्याची संकल्पना अशा विषयांवर विवेचन केले.

डॉ. बोराडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेमधील दिवस येथील त्यांचे अनुभव सांगितले. गांधीजींनी घेतलेले शिक्षण, बॅरिस्टर महात्मा असे मांडलेले विचार महत्त्वपूर्ण होते. याप्रसंगी लालबहादूर शास्त्री यांचे विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.

प्रा.मिलिंद खांदवे यांनी वरिष्ठ  कला शाखेच्या विद्यार्थ्यांना गांधीजींच्या कार्याची सविस्तर माहिती करून दिली. याप्रसंगी अक्षदा तांबोळी, सृष्टी पचपे, ज्ञानेश्वरी गराडे या विद्यार्थ्यांनी देखील गांधीजींच्या विचारांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. आर जाधव वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रा. एस पी भोसले, कला शाखेचे प्रमुख  प्रा.के.डी जाधव, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. आर एस आठवले, प्रा. डी. पी. काकडे तसेच विविध शाखांचे प्रमुख यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हर्षदा पाटील, प्राध्यापक आर एस आठवले, प्राध्यापक डी पी काकडे यांनी केले तर आभार प्राध्यापक स्मिता गायकवाड व प्राध्यापक अजित जगताप यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.