Talegaon News : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात ‘योगाचे जीवनातील महत्व ‘या विषयावर व्याख्यान

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक वसंत पवार यांचे ‘योगाचे जीवनातील महत्त्व ‘या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

याप्रसंगी बोलताना प्राध्यापक पवार म्हणाले की योग आपल्या जीवनशैलीशी जोडला गेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम,सध्यान-धारणा याच्या बळावर माणसाला निरामय आयुष्य जगता येऊ शकते. त्यामुळे योग साधना खऱ्या अर्थाने महत्त्वाची आहे. आजच्या तरुण पिढीने विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्याने योगाकडे गांभीर्याने पहावे. आपल्या दैनंदिन जीवनातला किमान अर्धा तास वेळ योग साधनेसाठी दिला तर निश्चितपणे आपल्याला आरोग्यदायी जीवन जगता येईल, असा संदेश त्यांनी या निमित्ताने दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले तसेच आभार शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुरेश थरकुडे यांनी मानले.

या व्याख्यानाचा लाभ सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने घेतला.योग दिनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे तसेच सर्व संचालकांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.