Talegaon News : लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची अतिरिक्त जबाबदारी

0

तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदाचा तात्पुरता पदभार लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडे जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र देशमुख यांनी सोपवला आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शाम पोशेट्टी आणि उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने सध्या रिक्त झालेल्या जागेवर प्रभारी म्हणून जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून मुख्याधिकारीपद रिक्त होते. शासनाने (4 मे ) मुख्याधिकारी म्हणून शाम पोशेट्टी यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.

मुख्याधिकारी शाम पोशेट्टी व उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड या दोन्ही अधिकाऱ्यांवर लाच मागण्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याने या रिक्त जागेवर सोमनाथ जाधव यांची प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment