Talegaon News : स्वीकृत सदस्यपदासाठी 18 मार्चला निवडणूक

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या दोन स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी येत्या गुरूवारी (दि.18) नगरपरिषदेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपकडून स्वीकृत सदस्य म्हणून सुरेश दाभाडे आणि जनसेवा विकास समितीकडून रवींद्र आवारे या दोघांनी मागील आठवड्यात आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाधिका-यांकडे सादर केले आणि ते मंजूरही झाले आहेत.

या दोन्ही रिक्त झालेल्या दोन जागांसाठी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांनी निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडीसाठी बुधवारी (दि 17) सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येईल. तर गुरूवारी (दि. 18) दुपारी 2 वाजता निवडणूक प्रक्रिया होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.