Talegaon News : मावळ तालुका संजय गांधी निराधार योजनेचा 77 जणांना लाभ

एमपीसी न्यूज – संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना वडगाव येथे पत्र देण्यात आले. मावळ तालुका संजय गांधी निराधार योजना समितीने अल्पावधीतच 77 पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

राज्यातील दुर्बल घटकांना आधार मिळावा, निराधार वृद्ध व्यक्ती, दिव्यांगांना आर्थिक आधार मिळावा, त्यांना सन्मानाने जगता यावे या हेतूने राज्य सरकार अशा कल्याणकारी योजना राबवित आहे. या समितीला मोठे अधिकार आहेत व निराधारांना आधार देण्यासाठी या समितीचे काम महत्त्वाचे आहे. त्यामुळे गरजू उपेक्षितांना तुमच्या माध्यमातून न्याय मिळू शकेल, यासाठी समितीने नेहमी सक्रीय राहून गावपातळीवर जनजागृतीद्वारे योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचवावी व त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे असे आवाहन आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी मार्गदर्शनाद्वारे केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, मावळ तालुका संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष नारायणराव ठाकर, गटविकास अधिकारी सुधाकर भागवत आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.