Talegaon News : मावळचा पुढचा आमदार आणि खासदारही भाजपचाच होणार : वासुदेव काळे

एमपीसीन्यूज : ‘राज्यामध्ये जरी भाजपा सत्तेवर नाही तरीही जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी भाजपा सदैव राहील, अशी ग्वाही भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली. मावळ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे यापुढचा आमदार भाजपाचा होणार असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले आहे. मावळचा आमदारच नव्हे खासदारही भाजपचाच होईल, असा विश्वासही काळे यांनी व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र प्रदेश भाजप कृषी मोर्चाचे नवनियुक्त सरचिटणीस संतोष दाभाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘कृषिनिष्ठ शेतकरी सन्मान सोहळा व अल्पभूधारक शेतकऱ्यांना खत वाटप’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काळे बोलत होते. तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा तथा संजय भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रभारी भास्कर म्हाळसकर, सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, तालुका किसान संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, नगरसेवक संतोष दाभाडे पाटील, सभागृह नेते अरूण भेगडेपाटील,उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सुभाष धामणकर, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, निकिता घोटकुले, माजी उपसभापती शांताराम कदम सह भाजपचे पदाधिकारी, किसान मोर्चाचे कार्यकर्ते, आजी – माजी नगरसेवक उपस्थित होते.

 बाळा भेगडे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक पेन्शन चालू करून दिली आहे. शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.

तर कृषिप्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे. शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनाबरोबर आर्थिक उत्पन्न वाढवणे गरजेचे असल्याचे गणेश भेगडे यांनी सांगितले.

सत्कारमूर्ती संतोष दाभाडे म्हणाले, मला मिळालेल्या पदाचा वापर मी शेतकरी आणि समाजाच्या हितासाठीच करणार. यावेळी रविंद्र भेगडे, भास्कर म्हाळसकर, सुशील सैंदाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत सुभाष धामणकर यांनी केले. प्रास्ताविक विकास शेलार यांनी केले. आभार अनंता कुडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.