Talegaon News : राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर महेश बेंजामिन यांची नियुक्ती करण्याची आमदार शेळके यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निवेदन सादर

तळेगाव दाभाडे – सेवा संघटना महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक महेश शैलेंद्र बेंजामिन यांची महाराष्ट्र राज्य  अल्पसंख्यांक आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती व्हावी, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले आहे.  तसेच ख्रिस्ती बांधव आणि बिशप साहेब व धर्मगुरू आदींनीही पत्राद्वारे मागणी केली आहे. 
याप्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके महेश बेंजामिन, सेवा संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सरोज साळवे आदीसह ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महेश बेंजामिन हे आमदार सुनील शेळके यांचे खंदे समर्थक म्हणून सुपरिचित असल्याने आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून त्यांना यश मिळावे, असा ख्रिस्ती बांधव, पाळक व बिशप साहेब आणि धर्मगुरू आदींचा मानस असून तसे मागणी पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश ख्रिश्चन सेवा संघटनेवर बेंजामिन हे संस्थापक म्हणून कार्यरत असल्याने सर्व तळागाळातील अल्पसंख्यांक बांधवांना विविध योजनांचा लाभ व सर्वतोपरी प्रयत्न करून मदत मिळून देण्यात कार्यतत्पर राहिले आहेत. त्यामुळे ख्रिश्चन समाजाचे धार्मिक धर्मगुरू तसेच मावळ परिसरातील अल्पसंख्यांक बांधवांचा त्यांना पूर्ण पाठींबा आहे.
 आमदार शेळके यांनी पत्रात म्हटले आहे की, बेंजामिन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांच्या पत्नी मोनिका महेश बेंजामिन ह्या तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा आहेत. बेंजामिन हे समाजासाठी काम करित असताना पुर्ण क्षमतेने लोकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या उपाध्यक्षपदावर काम करण्यास इच्छुक असून त्यांनी आपल्याकडे सदर पदावर नियुक्ती होण्यासाठी विनंती केली आहे. त्यामुळे महेश बेंजामिन यांच्या कार्याचा आढावा घेता त्यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या उपाध्यक्षपदावर निवड होण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी शिफारस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.