Talegaon News: जनसेवा विकास समितीकडून गणेश विसर्जनासाठी फिरता हौद

नागरिकांनी त्यांच्या घरच्या बाप्पाला निरोप द्यायला गर्दी न करता बाप्पा स्वयंसेवकांच्या हातात आणून द्यावा. निर्माल्य एका वेगळ्या पिशवीत काढून ते सुद्धा स्वयंसेवकांकडे जमा करावे.

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समिती तळेगाव दाभाडे (स्टेशन) यांच्या वतीने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जनाच्या सातव्या दिवशी शुक्रवारी (दि 28 ऑगस्ट) खास फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जनसेवा विकास समितीचे मुख्य प्रवर्तक किशोर आवारे यांची ही संकल्पना आहे. प्रशासनाच्या सुचनेनुसार नदी पात्रात व तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे समितीकडून फिरत्या हौदाचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे उद्योजक कल्पेश भगत यांनी दिली.

नागरिकांनी त्यांच्या घरच्या बाप्पाला निरोप द्यायला गर्दी न करता बाप्पा स्वयंसेवकांच्या हातात आणून द्यावा. निर्माल्य एका वेगळ्या पिशवीत काढून ते सुद्धा स्वयंसेवकांकडे जमा करावे. फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कच्या नियमांचे पूर्ण पालन करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

फिरता हौद शहरातील तीन मार्गांवरून फिरणार आहे. संबंधित भागातील नागरिकांनी स्वयंसेवकांकडे गणेश मूर्ती द्याव्यात. गणेश भक्तांच्या भावना आणि श्रध्दांचा आदर करून विसर्जनाचा विधी पार पाडणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.

मार्ग क्रमांक एक –
यशवंत नगर, तपोधाम कॉलनी, नाना भालेराव कॉलनी, सदगुरु कॉलनी, म्हाडा कॉलनी
वेळ – सकाळी 9 ते 12
स्वयंसेवक –
कल्पेश भगत- 9763608588
चंदन कारके- 9881291818
सविंद पाटील- 9766707299

मार्ग क्रमांक दोन –
योजना नगर-वनश्री नगर- विद्याविहार- रेनो-मनोहर नगर- जोशीवाडी- अंबिका पार्क- वतन नगर- आनंद नगर- इंद्रायणी कॉलनी- पारिजात कॉलनी
वेळ – दुपारी 12 ते 3
स्वयंसेवक –
रोहित लांघे- 9970266450
सुनील कारंडे- 9637017188
शेखर मुऱ्हे- 9604239191
नितीन दाभाडे- 8390879660
संदीप खालकर- 9922827840

मार्ग क्रमांक तीन –
अमरहिंद चौक – जागृती चौक – हरणेश्वरवाडी- वाघेला पार्क – हरणेश्वर कॉलनी – शहा कॉलनी- मावळ लँड- स्वराज्य नगरी
वेळ – दुपारी 3 ते 6
स्वयंसेवक –
अनिल ठाकर- 9922680831
महेश पवार- 9762262525
गणेश गरुड- 7030089144
सागर कडलक- 9923770991
चंद्रकांत सावंत- 9921981573

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.