Talegaon News : राष्ट्रवादी औद्योगिक सेलच्या तालुकाध्यक्षपदी नवनाथ हारपुडे

एमपीसीन्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या औद्योगिक सेलच्या मावळ तालुका अध्यक्षपदी कामशेत येथील ज्येष्ठ कार्यकर्ते नवनाथ हारपुडे यांची नियुक्ती करण्यात आली.

मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, खजिनदार सुभाष जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, यांच्या उपस्थितीत हारपुडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

हारपुडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक आहेत. त्यांनी यापुर्वीही औद्योगिक सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते उत्तम संघटक म्हणून सुपरिचित आहेत.

तालुक्यातील कामगारांचे प्रश्न सोडवून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनतंर हारपुडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.