Talegaon News : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगावात शनिवारी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा

एमपीसीन्यूज : माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी ( दि. 12) तळेगाव दाभाडे येथे कार्यकर्ता मेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

वैशाली मंगल कार्यालयात सकाळी साडे नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात माजी राज्यमंत्री मदन बाफना व माजी आमदार कृष्णराव भेगडे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक मावळचे आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली.

या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे. आणि सर्वांनी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.