Talegaon News : इंदोरी मध्ये तेलगळती आणि अग्नीशमनची प्रात्याक्षिके

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील इंदोरी गावात हिन्दुस्तान पेट्रोलियमच्या मुंबई पुणे सोलापूर पाईपलाईनच्या संपादित क्षेत्रामधे अनधिकृत खोदकाम केल्याने तेलगळती झाल्यास करावयाची आपात्कालीन उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्याक्षिके दाखवण्यात आले असून त्या अनुषंगाने आपत्कालीन स्थितीत करावयाच्या उपाययोजनांची माहिती या रंगीत तालीमद्वारे देण्यात आली.

आपत्कालीन सुचनेनंतर सायरन वाजवत अग्निशमन दलाची गाडी आली. त्यांनी आग विझवली त्यासाठी विशेष सुरक्षा उपकरणे आणि साधनांचा उपयोग करण्यात आला. ह्या रंगीत तालीममध्ये बेशुध्द झालेल्या कर्मचाऱ्यालाही उपचारासाठी पाठवण्यात आले, अर्थात हाही प्रत्याक्षिकाचाच एक भाग होता. प्रात्याक्षिकामध्ये आगीचे प्रमाण मोठे असल्या कारणामुळे तळेगाव MIDC अग्निशमन दलाचे अधिकारी स्वप्निल खडपकर व तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन दलाचे अधिकारी श्री. खुल्लारवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आग विझवण्यास मोलाची मदत केली.

यावेळी निरीक्षणासाठी विलास घोगरे, उपसंचालक -औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, NDRF चे डेप्युटी कमांडर दीपक तिवारी, तळेगाव दाभाडे MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक- श्री.कोळी, तलाठी इंदुरी स्वाती शिंदे, उपसरपंच इंदुरी- बालकृष्ण पानसरे. जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राउत, एच पी सी एल चे जनरल मनेजर राजा किशोर बारीक आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व उपस्थितांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. विनया नार्वेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि डेप्युटी जनरल मनेजर अनिल देवानानी यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी कुमार व इतर अधिकाऱ्यानी ही प्रात्याक्षिके सादर केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.