Talegaon News : शिक्षक दिनानिमित्त उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्यातर्फे गुरुजनांचा अनोखा सन्मान

वैशाली दाभाडे यांनी गुरुजनांच्या प्रति आदर व्यक्त करून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या गुरुजनांच्या घरी जाऊन सन्मान केला. गुरुजनांच्या प्रति आदर व्यक्त करून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत विशेष कार्याचा गौरव म्हणून सेवानिवृत्त शिक्षक गणपतराव काळोखे, सुनीता मधुकर संबुस, सोनबा गोपाळे, सुनीता सुरेश साखळकर, सुरेश साखळकर यांचा घरी जाऊन त्यांचा सन्मान केला.

दरम्यान, सुरेश साखवळकर यांना गुरूजन म्हणून नव्हेतर अष्टपैलू गुरूतुल्य व्यक्तिमत्व व संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

या वेळेस उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे समवेत नगरसेविका मंगला भेगडे, युवती अध्यक्षा निशा पवार, महिला उपाध्यक्षा ज्योति शिंदे आदी उपस्थित होत्या.

सन्मानार्थीना ट्रॉफी, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी कार्यरत असलेल्या गुरूजणांचा सत्कार केला जातो. मात्र यावेळी कोरोना संसर्गामुळे निवृत्त गुरूजनांचा सत्कार करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.