Talegaon News : बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी. फार्मसी) महाविद्यालय व बी बेटर अकॅडमीऑफ सायन्स अँड कॉमर्स, देहूरोड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. जैन यांनी दिली.

या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेच्या माध्यमातून बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावी नंतरच्या करियरसाठी उत्तम पर्याय आणि डिग्री अभ्यासक्रम याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. बारावी हा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. या महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थ्यांचे करिअर सुरक्षित होऊ शकते, या अनुषंगाने इंद्रायणी बी फार्मसी महाविद्यालय तळेगाव दाभाडे व बी बेटर अकॅडमी ऑफ सायन्स अँड कॉमर्स, देहूरोड यांच्या वतीने या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंद्रायणी बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. जैन यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनमध्ये विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बारावी हा विद्यार्थी दशेतील महत्त्वाचा टप्पा आहे आणि या टप्प्यातून मी पुढे जात असतांना योग्य निर्णय घेणे गरजेचे असते हा घेतलेला निर्णय विद्यार्थ्याला आयुष्यभर उपयोगी पडत असतो फक्त निर्णय योग्य घेता आला पाहिजे. जर निर्णय चुकला तर पश्चाताप करण्याशिवाय हाती काही उरत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी आपली अभ्यासातील आवड आपल्याला विषयाचे ज्ञान किती आहे आदी बाबी विचारात घेऊन आपल्या अभ्यासक्रमाची निवड करावी असे सांगितले. याच बरोबर बारावी सायन्स पास झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतांना काय काळजी घ्यावी याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयाची मान्यता, महाविद्यालयात उपलब्ध सोयीसुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा व महाविद्यालयात प्लेसमेंटसाठी केले जाणारे प्रयत्न आदी बाबीची माहिती विद्यार्थ्यांनी जरूर घ्यावी असे नमूद केले. तसेच शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्यांची माहिती त्यांनी यावेळी दिली, त्याच प्रमाणे महाविद्यालयीन प्रवेश घेतांना आवश्यक असणारी विविध कागदपत्रे, प्रवेश प्रक्रिया या विषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी डॉ. जैन यांनी बारावी सायन्सनंतर असणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची माहिती व त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची पात्रता व निकष याविषयी सविस्तर माहीती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यामध्ये प्रामुख्याने डी फार्म, बी फार्म, फार्म डी, बी एस्स्सी ऍग्री, होम सायन्स, पर्यावरणशास्त्र, फूड टेकनॉलॉजी, डेअरी फार्मिंग, मायक्रोबियॉलॉजी, बायोटेकनॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायो इन्फॉर्मेटिकस, हॉर्टिकल्चर, फिशरी, नुट्रीशन अँड डाएटिशियन, वैद्यकीय मध्ये एम बी बी एस, बी डी एस, बी एच एम एस, बी ए एम एस, बी यु एम एस इ. तसेच व्हेटर्नरी, फिसिओथेरपी, अभियांत्रिकी, पॉलीटेकनिक सह अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती डॉ. जैन यांनी यावेळी दिली.

तसेच त्यांनी बायोलॉजी या विषयात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना फार्मसी पदवी अभ्यासक्रम हा उत्तम पर्याय असे सांगितले फार्मसी क्षेत्र हे दिवसेंदिवस विस्तारत जाणारे क्षेत्र आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार्मसी पदवी धारकांना खूप मोठ्याप्रमाणात नोकरी व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत असेही त्यांनी सांगितले, तसेच फार्मसी पदवी धारक कधीच बेरोजगार राहू शकत नाही त्याला नोकरी मिळतेच असेही नमूद केले. या कार्यशाळेला बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची या कार्यशाळेत ऑनलाईन उपस्थिती होती.

या मार्गदर्शन कार्यशाळेचे प्रास्ताविक बी बेटर अकॅडमीचे संस्थापक कुणाल बन्सल यांनी केले, त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या आणि सुरक्षित करिअरसाठी योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन घ्यावे आणि आपल्या क्षमता ओळखून अभ्यासक्रमाची निवड करावी असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद खडके यांनी तर आभार प्रदीप घुले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.