Talegaon News : पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या गौरव

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल तळेगाव दाभाडे प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा विषेश सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश बोरुडे, संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे, सल्लागार रमेश जाधव, कार्याध्यक्ष प्रा.महादेव वाघमारे, सचिव प्रा. ऋषीकेश लोंढे, प्रकल्प प्रमुख जगन्नाथ काळे, राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे, प्रेस फोटोग्राफर चित्रसेन जाधव, अंकुश दाभाडे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

शाल, श्रीफळ आणि तुकाराम महाराज गाथा ग्रंथ देऊन डॉ. वाघमोडे यांना सन्मानित करण्यात आले.व्यवस्थापन (मॅनेजमेंट) विषयातील अभ्यास पूर्ण प्रबंध सादर केल्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने वाघमोडे यांना पीएचडी बहाल केली. पोलीस खात्यातील जबाबदारी सांभाळून हे यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक ऋषकेश लोंढे यांनी केले. गणेश बोरुडे आणि विलास भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले.

या सत्काराने मी भारावून गेलो असून काम करण्याची अधिक प्रेरणा मिळते, अशी भावना डॉ. वाघमोडे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.