Talegaon News : महावितरणचा गलथान कारभार; व्यावसायिकाला वीज वाहिनीचा शॉक

0

एमपीसी न्यूज – पारेख बिल्डिंगमध्ये शारदा कोल्ड्रिंक्स दुकानाच्या उद्घाटनाचे मंडप बांधताना व्यावसायिकाला धोकादायक ट्रान्सफॉर्मरच्या वीज वाहिनीचा शॉक लागून गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.18) सकाळी 11:35 वा. घडली. विद्युत महावितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

तळेगाव दाभाडे शहरात अनेक ठिकाणी धोकादायक ट्रान्सफॉर्मर असून नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

_MPC_DIR_MPU_II

योगेश शरद किरवे (वय 35 रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश किरवे हा त्याच्या दुकानाच्या उद्घाटनाचा मंडप बांधताना ट्रान्सफॉर्मरच्या विजेच्या वाहिनीचा शॉक लागला. यात 35 टक्के भाजला असून डोक्याला जखम झाली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, प्रशांत निळे, मुरलीधर कोकतरे, सुनील तळपे आदींनी घटनास्थळी भेट दिली. जखमींवर पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे करत आहेत.

उघड्यावर व धोकादायक असलेल्या ट्रान्सफॉर्मरला संरक्षित करण्याची मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.