Talegaon News :  प्रवीण माने यांची महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या सदस्यपदी निवड

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या करसंकलन विभागातील लिपिक प्रवीण शांताराम माने यांची महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना – पुणे विभागाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

पुणे विभागाचे अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष अनिल पवार यांनी प्रवीण माने यांना नियुक्तीचे पत्र दिले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्तरावर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी हि संघटना लढत देत असते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रवीण यांनी सांगितले.

माने यांच्या निवडीबद्दल कर अधिकारी विजय शहाणे यांनी मार्गदर्शन केले. माने यांचे अभिनंदन नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.