Talegaon News : कलेच्या आराध्या समोर रंगला गुलजार – एक कला प्रवास

एमपीसी न्यूज – यंदा तळेगाव मधल्या श्रीनगरी सोसायटी येथील सार्वजनिक गणेशोत्सवात कलापिनी फिल्म क्लब निर्मित ‘जय हो’ हा कवी गुलजार यांच्या काव्य आणि चित्रपट प्रवासाचा वेध घेणारा कार्यक्रम सादर केला गेला. हा कार्यक्रम दृक्श्राव्य स्वरूपात सादर झाला. शशांक ओगले आणि अरुणा ओगले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन झाले.

डॉ. अनंत परांजपे यांनी गुलजारांच्या बंदिनी चित्रपटापासून ते छपाक या चित्रपटपर्यंतच्या प्रवासाचा वेध त्यांच्या निवेदनातून आस्वादपूर्ण रित्या करून दिला. गुलजारांनी लिहिलेल्या दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमधील काही दृश्य व गुलजार यांनी लिहिलेली निवडक गाणी देखील दाखवून त्यांचे समीक्षणात्मक निरीक्षणे प्रेक्षकांना सांगून पूर्वी पाहिलेल्या गाण्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या कार्यक्रमाने दिला. सोबतच तरुणांना हे चित्रपट पाहण्यासाठी उद्युक्त केले.

कार्यक्रमाचा शेवट आनंद चित्रपटातील गाण्याने झाला. कार्यक्रम सर्व उपस्थित प्रेक्षकांना भावला. सर्वांनी उत्तम दाद दिली. श्रीनगरीतील डॉ. दीपक गंगोळी यांनी डॉ. अनंत परांजपे यांचे आभार मानले. ‘चित्रपट बघण्याची आणि त्याचा आस्वाद आनंद घेण्याची नवी दृष्टी या कार्यक्रमाने मिळाली’ असे त्यांनी सांगितले, सोबतच अशा नवनवीन कार्यक्रमांचे स्वागत करण्यास आम्ही सर्व रसिक कायमच तयार आहोत असे सांगितले, या कार्यक्रमासाठी चेतन पंडित याने तांत्रिक सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.