Talegaon Dabhade News: काँग्रेस कमिटीतर्फे योगी सरकारचा जाहीर निषेध

एमपीसी न्यूज – भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. ​हाथरस ​येथे बलात्कार झाला याचा निषेध तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात करण्यात आला.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस​ ​प्रियंका गांधी यांना पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी यूपी पोलिसांनी अडवले आणि राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली व दोघांना अटक केली याचा निषेध तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक निखिल कवीश्वर, माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, मावळ तालुका युवक कार्याध्यक्ष जितेंद्र  खळदे, तळेगाव शहर युवक अध्यक्ष विशाल वाळुंज, राम शहाणे, आनंद मोरे, राजू फलके, निनाद हरपुडे, मतीन तांबोळी, वैष्णवी झगडे, विजय काशीद, गणेश काजळे, शिवाजी काळोखे, सूर्यकांत बोराडे, संकेत खळदे, सौरभ खळदे,  दिलीप चौधरी, नवनाथ कुल, अरूण दिघे सचिन हाके आदी  मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.