Talegaon News : राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी राजेश पानसरे

एमपीसीन्यूज  : आंदर मावळ ( पूर्व विभाग ) राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी आंबळे गावचे युवा कार्यकर्ते राजेश बाळू पानसरे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली.

निवडीचे पत्र आमदार सुनिल शेळके, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, सोशल मिडीया तालुका अध्यक्ष संजय शेडगे व सरचिटणीस सुदाम कदम यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

त्याचप्रमाणे तालुका उपाध्यक्षपदी निगडे गावचे विशाल सुखराम पाटारे व तालुका सरचिटणीसपदी ताजे गावचे तेजस केदारी यांना देखील मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासकामे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम निश्चितपणे करण्याचा मनोदय नवनियुक्त पदाधिका-यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.