Talegaon News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, सभागृह नेते अरुण भेगडे, संतोष दाभाडे पाटील, नगरसेविका शोभा भेगडे, नीता काळोखे, कल्पना भोपळे, प्राची हेंद्रे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीला लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज पहात आहेत. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने अनेक प्रशासकीय विकास कामे प्रलंबित आहेत.

कोरोना संक्रमणाच्या काळात नगर परिषदेमध्ये कोणतेही भरीव विकास काम झालेले नाही. तसेच यामुळे मालमत्ता कर देखील चांगल्या प्रमाणात वसूल झाला नाही. प्रशासकीय कामकाजाचे ठोस निर्णय घेण्यासाठी व रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी पाहिजे.अशी मागणी निवेदनात केली आहे.

फेब्रुवारी मध्ये येथील मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची उच्च पदावर नियुक्ती झाल्याने तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारीपद रिक्त झाले.या जागी मे महिन्यामध्ये शासनाच्या वतीने श्याम पोशेट्टी यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली. परंतु लाच मागणी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा मुख्याधिकारी पद रिक्त झाले. सध्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून सोमनाथ जाधव हे कामकाज पहात आहेत. नव्याने कोण मुख्याधिकारी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.