Talegaon News : तळेगावातील रोटरी क्लबच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

एमपीसीन्यूज : कोरोना संकटात ल्युकेुमिया, एनिमिया ( Leukemia, Anemia) सारख्या अनेक रुग्णांना भासणारी रक्ताची गरज तसेच सध्या जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी (Rotary Club of Talegaon MIDC) व गरवारे ब्लड बँक (Garware Blood Bank) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान ( Blood Donation) केले.

तळेगाव पोलीस स्टेशन येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन रोटरी अध्यक्षा रजनीगंधा खांडगे व माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक संतोष खांडगे, सुदाम दाभाडे, प्रवीण भोसले, मिलिंद शेलार, सचिन कोळवणकर, गौरी पाटील, दशरथ जांभुळकर आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये हे एकूण 30  रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे नियोजन प्रकल्पप्रमुख विल्सेन सालेर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी तर आभार सुमती निलवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.