Talegaon News: भाजपकडून जनसेवा विकास समितीला दोन जादा सभापतिपदांचे ‘रिटर्न गिफ्ट’ – संतोष भेगडे

एमपीसी न्यूज – मागील आठवड्यात झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जनसेवा विकास समितीने तटस्थ भूमिका घेऊन एकप्रकारे भारतीय जनता पक्षाचा उपनगराध्यक्ष होण्यासाठीच छुपा पाठिंबा दिला होता हे सिद्ध होते.त्याच्याच बदल्यात आज भारतीय जनता पक्षाने रिटर्न गिफ्ट म्हणून जनसेवा विकास समितीला दोन जास्तीची विषय समिती सभापती पदे देऊ केली आहेत, असा आरोप तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे नगरसेवक संतोष भेगडे यांनी केला आहे.

जनसेवा विकास समितीच्या या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस प्रणित तळेगाव शहर सुधारणा व
विकास समिती यांचे नुकसान झालेले निदर्शनास येते, असेही भेगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सात विविध समित्यांच्या सदस्य व सभापती निवडींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.

सध्याचे सभागृहातील पक्षीय बलाबल तसेच मागील आठवड्यात जनसेवा विकास समितीने घेतलेली तटस्थ भूमिका पाहता निवडणूक प्रक्रिया झाली असती तर भाजपा – 5, तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती – 1 , जनसेवा विकास समिती – 1 असे समित्यांचे सभापती पदे भेटणे अपेक्षित होते, असे भेगडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.