Talegaon News : कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूदरामुळे शवदाहिनीवर अतिरिक्त भार; प्रांताधिकारी यांना निवेदन

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाढणारा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू दर लक्षात घेता शवदाहिनीवर अतिरिक्त भार पडत आहे. त्याठिकाणचा भार कमी करण्याबाबतचे लेखी निवेदन स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांनी प्रांताधिकारी संदेश शिर्के यांना दिले. त्यात शवदाहिनीवरील अतिरिक्त भार कमी व्हावा, या अडचणीची मागणी केली आहे.

त्यावर प्रांताधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे भेगडे यांनी सांगितले. तथापि आश्वासनाची पुर्तता कशी होणार हा औत्सुक्याचा विषय राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

भेगडे यांनी निवेदनात तळेगावातील कोरोनाची भयानक परिस्थिती मांडली आहे तसेच तळेगावामध्ये असणाऱ्या गॅस शवदाहिनीवर तालुक्यातीलच नव्हे तर तालुक्याच्या बाहेरील सुद्धा कोरोनामुळे झालेले मृतदेह त्याठिकाणी शवदाहिनीवर येत आहेत. त्या मृतदेहा बरोबर तळेगावमध्ये येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असून त्या ठिकाणी गॅस शवदाहिनीवरती मृतदेह दहन केले जातात. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे आजूबाजूच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा त्रास जाणवत आहे.

तालुक्यात फक्त तळेगाव दाभाडे येथील एकच शवदाहिनी असल्याने त्या शवदाहिनी व कर्मचा-यांवरही अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी यामध्ये लक्ष घालून लोणावळा, वडगाव असेल या ठिकाणी नवीन गॅस शवदाहिनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध करून द्यावी, अशी लेखी विनंती केलेली आहे

यावर सकारात्मक प्रतिसाद दाखवत प्रांताधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यामध्ये वडगाव किंवा लोणावळा या ठिकाणच्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन देखील दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.