Talegaon News : रोटरी क्लबतर्फे तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राला लसीकरण साहित्य भेट

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कोविड-19 लसीकरणासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले. शुक्रवारी (दि.02) हा कार्यक्रम पार पडला.

वैद्यकीय साहित्यात डिजिटल ब्लड प्रेशर अपॅरेटस, पल्स ऑक्सिमिटर, थर्मल गन, स्टेटेस्कोप, सॅनिटायजर, फेस मास्क यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. गेंगजे आणि डॉ. फोले यांच्याकडे हे साहित्य सूपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल दांडेकर यांनी कोविड-19 लसीकरण या विषयावर आपले मत व्यक्त केले.

वैद्यकीय साहित्य लोकार्पण कार्यक्रमात प्रकल्प प्रमुख डॉ. सुर्यकांत पुणे, सचिव अनिश होले, जयवंत देशपांडे, ऋषिकेश कुलकर्णी, दिपक गंगोळी, धनंजय मथुरे उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.