Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीने उभारले कोविड सेंटर

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग तसेच तळेगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील पणन महामंडळ येथे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या शुभहस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष रो. संतोष शेळके, रो. सचिव दिपक फल्ले, प्रोजेक्ट मॅनेजर रो. संजय मेहता, रो. दिलीप पारेख उपस्थित होते. तसेच पंकज शहा, रो. शितल शहा, रो. संतोष अगरवाल, असिस्टंट गव्हर्नर गणेश कुदळे हे देखील उपस्थित होते.

‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रोटरी क्लबने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांना सुविधा उपलब्ध झाल्या आहे. रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत सुरु केलेले कोविड सेंटर हे कौतुकास्पद आहे,’ असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लबच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी क्लबचे संस्थापक अध्यक्ष रो. विलास काळोखे, रो. विक्रम काकडे, रो. संदीप काळोखे, रो. किरण काकडे, रो. चंद्रकांत पाटील या सदस्यांनी आर्थिक योगदान दिले असून यांच्या मोलाच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभा करण्यास मदत झाली आहे.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रो. नितीन शहा, रो. सुरेश शेंडे, रो. रेश्मा फडतरे, रो. शाहीन शेख, रो. वैशाली खळदे, रो. शरयू देवळे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.