Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वर्धापनदिनानिमित्त आत्मनिर्भर दिव्यांग व कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचा वर्धापनदिन व संस्थापक विलास काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार (दि. 14) सायंकाळी आत्मनिर्भर दिव्यांग व कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कोरोना योद्धा म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, जिल्हा संचालक दिलीप देशपांडे व प्रा. महादेव वाघमारे उर्फ ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांना कोरोना योद्धा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच विलास काळोखे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी रोटरी प्रांत चेअरमन दिलीप देशपांडे, रोटरी संस्थापक विलास काळोखे, रोटरी अध्यक्ष राजेश गाडे पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सेवा निवृत्त अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी संस्थापक संतोष खांडगे, दिलीप पारेख, संजय मेहता, भगवान शिंदे, संजय चव्हाण, संतोष शेळके, मनोज ढमाले, किरण ओसवाल, बाळासाहेब रिकामे, डॉ. मिलिंद निकम, मिलिंद शेलार, राजू कडलक, शरयू देवळे, सुरेश दाभाडे, प्रशांत ताये व बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.

रशीदा गलगले या अपंग महिलेला आत्मनिर्भर होण्यासाठी 25,000 रुपयांची अत्याधुनिक शिलाई मशीन देण्यात आली. यावेळी रशीदा गलगले म्हणाल्या कोरोनाच्या काळात जगण्याला आधार मिळाला. रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे खूप आभार.

याप्रसंगी रोटरी प्रांत चेअरमन दिलीप देशपांडे म्हणाले हास्याने ऑक्सिजन वाढते पण दिल्याने समाधान मिळते. रोटरी माणूसकी जिवंत ठेवण्याचे काम करत आहे. मागणाऱ्या हातांना काम दिल्यावर तो आत्मनिर्भर होतो. रोटरी माणसाचे आयुष्य घडविते.”

“संस्थापक विलास काळोखे म्हणाले समाजातील गरीब गरजूंना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. माणसाने माणसाच्या मदतीला जाणे हीच माणूसकी आहे. समाजाची सेवा करण्याची संधी मिळत असल्याचे समाधान वाटते.”

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, राजेश गाडे पाटील, डॉ. दिलीप देशपांडे, प्रा. महादेव वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मेहता यांनी केले. सूत्रसंचालन दीपक फल्ले यांनी केले. आभार किरण ओसवाल यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.