Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे पाच हाॅस्पिटलांना कोरोना प्रतिबंधक किट्सचे मोफत वाटप
एमपीसीन्यूज : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे समाज कर्तव्याचे भान राखत कोरोना प्रतिबंधासाठी लढणा-या तळेगाव शहरातील हाॅस्पिटलला अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षा रो. रजनीगंधा खांडगे, संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खांडगे यांच्या हस्ते 16 बाॅक्सेस मास्क, पीपीई किट्स, 300 बाॅटल सॅनिटायझर, भाऊसाहेब सरदेसाई हाॅस्पिटल, इंद्रायणी हाॅस्पिटल, युनिक हाॅस्पिटल, पार्वती हाॅस्पिटल, नागरे हाॅस्पिटल इत्यादी हाॅस्पिटलमध्ये वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सचिव रो.सचिन कोळवणकर, उपाध्यक्ष रो. विल्सेंट सालेर, रो.सुदाम दाभाडे, रो.अनिल धर्माधिकारी, रो.प्रविण जाधव, रो.रवी दंडगव्हाळ, रो.रूथ सालेर इत्यादी उपस्थित होते.