Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीतर्फे वानप्रस्थाश्रमास मोफत शिधा वाटप

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या रोटरी सदस्या रो. वैशाली दहीतुले यांच्या वाढदिवसानिमित्त  तळेगाव स्टेशन येथील  वानप्रस्थाश्रम वृद्धाश्रमास एक महिन्याचा शिधा (गहू, तांदूळ, साखर, तूरडाळ, तेल, पोहे, रवा, मसाले, बिस्कीट) वाटप करण्यात आले .
वानप्रस्थाश्रमाच्या विश्वस्त उर्मिला छाजेड स्वागतपर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी दरवर्षी वानप्रस्थाश्रमास भरघोस मदत करत असते. वृद्धाश्रमात ४५ वृद्ध मंडळी राहत आहेत. त्यांचे आशिर्वाद सदैव रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या पाठीशी आहेत.
रो. वैशाली दहीतुले यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब अध्यक्षा रो. रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना रो. वैशाली दहीतुले म्हणाल्या की, आज पहिल्यांदाच माझा वाढदिवस सामाजिक कार्य करून पार पाडताना याचे मला मोठे समाधान होत आहे. त्याबद्दल मी रोटरी क्लबला धन्यवाद देते.
रोटरी क्लब अध्यक्षा रो. रजनीगंधा खांडगे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की रो. वैशाली दहीतुले या नवीन रोटरी सदस्या आहेत. त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.  कोरोनामुळे शाळा बंद असल्याने वृद्धाश्रमात शिधावाटप करण्याचे रोटरी क्लबने ठरवले . वृद्धाश्रमातील आजीआजोबांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घ्यावी.  माझे सहकारी, माझी जबाबदारी या उद्देशाने आपण सतर्क राहावे.
रो. संतोष खांडगे यांनी सूत्रसंचालन केले. रो. सचिन कोळवणकर यांनी आभार प्रदर्शन केले.  रो. मिलिंद शेलार व रो. योगेश शिंदे यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.