Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे उपक्रम स्तुत्य : माधव सूर्यवंशी

0

एमपीसीन्यूज : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्यावतीने राबविण्यात येत असलेले विविध समाजोपयोगी उपक्रम खरोखर स्तुत्य आहेत, असे गौरवोद्गार पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक माधव सूर्यवंशी यांनी काढले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ट्रक चालकांसाठी उर्से टोलनाक्यावर आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक माधव सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी सेवानिवृत्त परिवहन अधिकारी रामराव यलजाले, रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक संतोष खांडगे, मच्छिंद्र घोजगे, सुदाम दाभाडे, हिरामण बोत्रे, पवना हॉस्पिटलचे डॉ. सुनील राठोड, डॉ. विश्वनाथ पाटील, दमयंती वाणी, प्रतीक्षा काळे, एकादशी कांबळे तसेच देवदूत फायर फोर्सचे विशाल कदम, स्वप्नील शिंदे, नितीन निकम, मयुर मोरे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी प्रास्ताविकामध्ये covid-19 च्या काळात रोटरी राबवत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ते कै. सतीश शेट्टी यांच्या स्मरणार्थ हा प्रकल्प गेली बारा वर्षांपासून राबवण्यात येत असल्याचे सांगितले.

वाहन चालवताना काळजी घेतल्यास जीव वाचवणे शक्य आहे. त्यामुळे गाडी चालवताना मोबाईल टाळा. सीट बेल्ट लावा. मद्यप्राशन करून गाडी चालवू नका, असे आवाहन महामार्ग पोलीस निरीक्षक अमोल पवार यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख डॉ. विजय इंगळे, सचिन कोळवणकर, प्रवीण जाधव, विल्सेन्ट सालेर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. आभार शंकर हदिमनी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment