Talegaon News: रोटरी क्लबच्या अध्यक्षा हातात टेम्परेचर गन घेऊन मोहिमेत सामील

आमदार शेळके यांच्या आवाहनाला रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमात सहभागी होण्याचे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीला आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक साद देत रोटरीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या स्वयंसेवकांसोबत मिळून नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली.

कोरोनाचा विळखा राज्यात आणि देशात वाढत असून त्याविरोधात लढण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मागील सात महिन्यांपासून सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहे. मावळ तालुक्यात देखील कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक उपाययोजना राबवून देखील तळेगाव शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार वाढत आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबवला आहे. तो उपक्रम तळेगाव शहरात देखील राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी अभियानात कोरोना बाधित आढळणा-या रुग्णांवर शासनाकडून मोफत उपचार केले जात आहेत.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीने देखील आपल्या स्वयंसेवकांसोबत या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले होते. त्याला रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीने सकारात्मक साद दिली आहे. क्लबच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी स्वतः या अभियानासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी त्यांच्या महिला स्वयंसेवकांसोबत मिळून घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली. रो.अलका शेलार, रो. अश्विनी कोळवणकर, रो. गौरी पाटील, रो. मंजुश्री हादिमणी. रो. जयश्री घोजगे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.