Talegaon News : रायन फुटबॉल संघांना फिट इंडिया फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

आर्यन काळे, ओमर शेख बेस्ट प्लेयर्स

एमपीसी न्यूज – फिट इंडिया आणि खेल विकास मोहिमे अंतर्गत जागतिक फुटबॉल दिनानिमित्त येथे घेण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत रायन फुटबॉल अकादमीच्या संघांनी दोन्ही गटात विजेते आणि उपविजेतेपद पटकावले. सिनिअर्स गटात आर्यन काळे तर जुनिअर्स गटात ओमर शेख हे बेस्ट प्लेयर्स ठरले.

एन. सी. ई. आर. इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत मुलींनी फुटबॉल स्पर्धेत घेतलेला सहभाग आशादायक असल्याचे मत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलच्या शिक्षण समिती अध्यक्षा तथा रोटरी एमआयडीसीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.

यावेळी आंतरराष्ट्रीय जुनिअर्स फुटबॉलपटू अजिंक्य देसाई, राष्ट्रीय फुटबॉलपटू मनोज स्वामी, विजयकुमार चिन्नया, नूतन इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. ललीतकुमार वाधवा, ए.आर.सी. कमिटी सदस्य अमीन खान, क्रीडा संचालक प्रा. राजेंद्र लांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रजनीगंधा खांडगे म्हणाल्या, की मावळ सारख्या ग्रामीण, आदिवासी भागात फुटबॉलचा प्रचार, प्रसार आणि प्रशिक्षण झाल्यास गुणी मुलामुलींना त्यांचे क्रीडा कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल.

अमीन खान म्हणाले, की कोणत्याही क्षेत्रात दीर्घकाळ ठसा उमटण्यासाठी मैदानी खेळाला पर्याय नाही.

यावेळी फुटबॉल कोच रोहित पाठक, देवेन्द्र कुमार, मोहित पाठक यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना, नूतन इंजिनिअरिंग कॉलेज तर्फे फिट इंडिया मोहिमे अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

एनसीईआर इंजिनिअरिंग कॉलेजचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. रवी दाभाडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.